रेल्वे प्रवाशांनो लक्ष्य द्या ; भुसावळातून जाणाऱ्या ‘या’ १२ गाड्या रद्द, ६ शाॅर्ट टर्मिनेट

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२१ । रेल्वेने प्रवेश करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील बडनेरा रेल्वे स्थानकावरील गुड्स वॅगन रिपेअर डेपाे लाइनचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. या कामाचा थेट परिणाम या मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांवर हाेणार आहे. या मार्गावरील १२ गाड्या आज २७ ऑक्टाेबरपासून वेगवेगळ्या दिवशी रद्द, ६ गाड्या शाॅर्ट टर्मिनेट, तर २ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

या गाड्या रद्द 

त्यात प्रशासनाने १२ रेल्वे गाड्या रद्द केल्या आहे. त्या पुढीलप्रमाणे ०२१११ मुंबई-अमरावती एक्स्प्रेस (२९ व ३० ऑक्टाेबर), ०२११२ अमरावती-मुंबई एक्स्प्रेस (२८ व २९ ऑक्टाेबर), ०२११७ पुणे-अमरावती एक्स्प्रेस (२७ ऑक्टाेबर), ०२११८ अमरावती-पुणे एक्स्प्रेस (२८ ऑक्टाेबर), ०२१६९ सीएसएमटी-नागपूर एक्स्प्रेस, ०२१७० नागपूर- सीएसएमटी एक्स्प्रेस (२९ व ३० ऑक्टाेबर), ०२१८९ सीएसएमटी-नागपूर एक्स्प्रेस व नागपूर सीएसएमटी एक्स्प्रेस (२८ व २९ ऑक्टाेबर), ०२११३ पुणे-नागपूर एक्स्प्रेस (३० ऑक्टाेबर), नागपूर-पुणे एक्स्प्रेस (२९ ऑक्टोबर), ०२०४१ पुणे-नागपूर एक्स्प्रेस (२८ ऑक्टाेबर), ०२०४२ नागपूर-पुणे एक्स्प्रेस (२९ ऑक्टाेबर).

या गाड्यांच्या मार्गात बदल

याशिवाय दोन गाड्यांच्या मार्गात बदल केला आहे. त्यानुसार ०११३७ अहमदाबाद-नागपूर एक्स्प्रेस २७ ऑक्टाेबरला भुसावळ-इटारसी-नागपूर अशी धावेल. तर ०११३८ नागपूर-अहमदाबाद एक्स्प्रेस २८ ऑक्टाेबरला नागपूर–इटारसी भुसावळमार्गे धावेल.

या एक्स्प्रेस अकोला, भुसावळपर्यंत
०७६४१ काचीगुडा-नरखेड एक्स्प्रेस २८ व २९ रोजी अकोल्यापर्यंत धावेल, नरखेड-काचीगुडा २९ व ३० ला अकोल्यापासून सुरू होईल, ०२७६६ अमरावती-तिरुपती एक्स्प्रेस २८ ऑक्टाेबरला अकोल्यापासून सुरू होईल, तिरुपती-अमरावती एक्स्प्रेस २६ ऑक्टाेबरला अकोल्यापर्यंत धावेल. ०९१२६ अमरावती-सुरत एक्स्प्रेस २९ व ३० ला भुसावळपासून सुटेल. तर सुरत-अमरावती एक्स्प्रेस २८ व २९ ला भुसावळपर्यंतच धावेल.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज