मामाच्या गावी आलेल्या‎ ‎१० वर्षीय भाच्याचा शॉक‎ लागून मृत्यू

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२१ । यात्रेसाठी‎ मामाच्या गावी आलेल्या‎ ‎१० वर्षीय‎ ‎भाच्याचा शॉक‎ ‎लागून दुर्दैवी मृत्यू  झाल्याची घटना यावल‎ तालुक्यातील डांभुर्णी येथे घडली. भावेश‎ साई नाथ बागुल (रा.कोळगाव‎ ता.भडगाव) असे त्याचे नाव आहे.‎

गावातील यात्रेनिमित्त डांभुर्णी‎ येथील रहिवासी सागर अशोक‎ सपकाळे यांच्याकडे बहिण व भाचे‎ आले होते. शुक्रवारी दुपारी‎ ग्रामपंचायतीकडून नळांना पाणी‎ पुरवठा सुरू होता. यावेळी सपकाळे‎ ‎ यांच्या घरात पाणी भरण्यासाठी‎ इलेक्ट्रिक मोटार लावली होती.‎ यादरम्यान घराच्या ओट्यावर पाणी‎ सांडले. याच ओल्या ओट्यावर‎ पंपाच्या वायरमधून वीज प्रवाह‎ उतरला होता.

नेमके यावेळी सागर‎ सपकाळे यांचा भाचा भावेश बागुल‎ (वय १०) हा खेळण्यासाठी पायात‎ चप्पल न घालताच घराबाहेर‎ निघाला. मात्र, ओल्या ओट्यावर‎ शॉक लागून तो खाली कोसळून‎ बेशुद्ध झाला. यानंतर त्याला‎ जळगाव येथे जिल्हा शासकीय‎ वैद्यकीय महाविद्यालय व‎ रुग्णालयात दाखल करण्यात आले.‎ मात्र, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित‎ केले. शुक्रवारी रात्री डांभुर्णीत‎ अंत्यसंस्कार झाले.‎

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -