fbpx

आ.चिमणराव पाटलांच्या विकास निधीतून सात प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी १० ऑक्सीजन बेड

mi-advt

एरंडोल-पारोळा भडगाव मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील यांनी वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता मतदार संघातील ७ प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी १० ऑक्सिजन बेडची शिफारस जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

सध्या सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून अनेक ठिकाणी अशा रुग्णांना बेड मिळणे अशक्य झाले आहे रुग्णांची सोय वैद्यकीय सेवा देण्यासाठी  सध्याची परिस्थिती पाहता आमदार चिमणराव पाटील यांनी यांच्या स्थानिक विकास निधीतून अत्यंत महत्त्वाची अशी शिफारस जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे केली असून मतदार संघातील खालील प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी १० ऑक्सीजन बेड  मिळणे कामी शिफारस केली आहे

 

1)  मंगरुळ तालुका पारोळा 2)  तामसवाडी तालुका पारोळा     3)गिरड तालुका भडगाव  4)पिंपरखेड तालुका भडगाव 5)तळई तालुका एरंडोल  6)रिंगणगाव तालुका एरंडोल  7)कासोदा तालुका एरंडोल  या प्रमाणे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रास १० असे एकूण ७० बेड  आरोग्य केंद्रांना लवकरच आता मिळणार आहे. ऑक्सीजन बेड मिळाल्याने फार मोठी सोय रुग्णांची  होणार आहे

सदर कामांना त्वरित मंजुरी मिळावी असे  पत्र आमदार चिमणराव पाटील यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे केली असल्याची माहिती प्रांत अधिकारी विनय गोसावी यांनी सदरची माहिती दिली आहे

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज