fbpx

लक्ष द्या ! आजपासून ‘या’ महत्वाच्या गोष्टीमध्ये होणार बदल, जाणून घ्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२१ । आज म्हणजेच १ ऑक्टोबरपासून नागरिकांसाठी अनेक महत्वाच्या गोष्टीमध्ये बदल होणार आहे. हे बदल बँकिंग, पेमेंट सिस्टम, शेअर मार्केट इत्यादींशी संबंधित आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होईल. जाणून घेऊया होणाऱ्या या महत्त्वाच्या बदलांबाबत थोडक्यात…

१. या बँकांचे चेक रद्द केले जातील :

1 ऑक्टोबरपासून तीन बँकांची चेकबुक निरुपयोगी होतील. जर तुमचे अलाहाबाद बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स किंवा युनायटेड बँक ऑफ इंडियामध्ये खाते असेल तर ही माहिती फक्त तुमच्यासाठी आहे. तुमची जुनी चेकबुक 1 ऑक्टोबर 2021 पासून निरुपयोगी होतील. नवीन चेकबुकसाठी तुम्ही या बँकांशी संपर्क साधा.

२. डीमॅट खाते निष्क्रिय होईल
सेबीने डीमॅट आणि ट्रेडिंग खाती असलेल्या लोकांना 30 सप्टेंबर 2021 पूर्वी केवायसी तपशील अपडेट करण्यास सांगितले. त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत तुमच्या डीमॅट खात्यात केवायसी अपडेट केले नसेल तर तुमचे डीमॅट खाते निलंबित केले जाईल आणि तुम्ही बाजारात व्यापार करू शकणार नाही. जोपर्यंत तुम्ही केवायसी अपडेट करत नाही, तोपर्यंत ते सक्रिय होणार नाही.

३. नामांकित व्यक्तीची माहिती द्यावी लागेल
त्याचप्रमाणे आता शेअर बाजाराच्या डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यात नामनिर्देशित व्यक्तीची माहिती देणे आवश्यक आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराला नामांकन द्यायचे नसेल, तर त्याला त्याबाबत एक घोषणा फॉर्म भरावा लागेल. जुन्या डीमॅट खातेधारकांना देखील फॉर्म भरावा लागेल आणि 31 मार्च 2022 पर्यंत ही माहिती द्यावी लागेल. तुम्ही कोणतीही माहिती न दिल्यास ट्रेडिंग आणि डीमॅट खाते गोठवले जाईल.

४. अन्न व्यवसायात कडकपणा
अन्न सुरक्षा नियामक एफएसएसएआयने अन्न व्यवसाय चालकांना एफएसएसएआय परवाना क्रमांक किंवा नोंदणी क्रमांकाची माहिती रोख पावती किंवा खरेदी चालानवर देणे बंधनकारक केलेय. जर एखाद्या व्यावसायिकाने FSSAI च्या या नियमाचे पालन केले नाही, तर त्याचा परवाना किंवा नोंदणी रद्द केली जाऊ शकते.

५. पगाराच्या १० टक्के म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक
म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवूदारांचे हित लक्षात घेऊन सेबीने म्युच्युअल फंड हाऊसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवा नियम जारी केला आहे, जो उद्यापासून लागू होईल. या नियमानुसार, अॅसेट अंडर मॅनेजमेंट कंपनी म्हणजे म्युच्युअल फंड हाऊसच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना त्यांच्या एकूण पगाराच्या १० टक्के हिस्सा म्युच्युअल फंड युनिटमध्ये गुंतवावा लागेल. हा नियम टप्प्याटप्प्याने अंमलात आणला जात आहे आणि १ ऑक्टोबर २०२३ पासून ही गुंतवणूक २० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात येईल.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज