पारोळा‎ शहर जलकुंभासाठी १ कोटींचा निधी मंजूर‎

बातमी शेअर करा

‎जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२१ । पारोळा‎ शहराची वाढती लोकसंख्या पाहता ‎सध्या असलेली पिण्याच्या पाण्याची ‎साठवणूक सुविधा, जलकुंभ व ‎जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता ‎वाढविण्यासाठी, शासनाने निधी‎ द्यावा, अशी मागणी २६‎ ऑक्टोबरला माजी नगराध्यक्ष‎ चंद्रकांत पाटील यांनी केली होती.‎ त्यासंदर्भात शिवसेना जिल्हा प्रमुख‎ डॉ.हर्षल माने यांनी पाठपुरावा‎ केला. त्यामुळे या कामांसाठी एक‎ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.‎

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे‎ यांच्याकडे यासंदर्भात मागणी‎ ‎करण्यात आली होती. त्यांनी‎ तात्काळ या याेजनेला मंजुरी देऊन‎ नगरविकास विभागामार्फत‎ वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून १ कोटी‎ रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या‎ बाबत शासनाने ३ नाेव्हेंबरला‎ आदेश पारित केले आहेत. नवीन‎ जलकुंभ उभारणी व जल‎ ‎शुद्धीकरणाची क्षमता वाढल्यानंतर‎ शहराला किमान एक दिवसाआड‎ पाणीपुरवठा करणे शक्य होईल.

या‎ कामात पालकमंत्री गुलाबराव‎ पाटील, आमदार चिमणराव पाटील‎ यांचे सहकार्य लाभल्याचे अशी माहिती डॉ. माने‎ व माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील‎ यांनी दिली.‎

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -