⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | 50 हजारांच्या ठिबक नळ्या चोरीला; गुन्हा नोंद

50 हजारांच्या ठिबक नळ्या चोरीला; गुन्हा नोंद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२२ । शेतातील 50 हजार रुपये किंमतीच्या ठिबकच्या नळ्या चोरट्यांनी लांबवल्या. यावल पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

विकास गणेश पाटील ( वय 39) हा युवक यावल तालुक्यातील सांगवी खुर्द येथे कुटुंबासह राहत शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. टेंभी, ता.यावल शिवारात भगवान उखर्ड पाटील, रा. टेंभी खुर्द यांचे मालकीचे शेत गट नं. 85 हे शेत ते नफ्याने करतात. सदर शेतातील 16वा ठिबकच्या नळ्या प्रत्येकी 600 मिटर असे सुमारे 18 बंडल गोळा करुन शेतातील निंबाच्या झाडाखाली ठेवले होते. शुक्रवार, 27 मे रोजी रात्री 11.00 वाजेपर्यंत ते शेतात पाण्याची मोटर पाहण्यासाठी गेले होते. तेव्हा सदर शेतातील ठिबकच्या नव्या सुस्थितीत होत्या. पाण्याची मोटर पाहून ते रात्री 11.30 वाजेच्या सुमारास शेतातून निघून घरी गेले.शनिवार, 28 मे रोजी शेतात काम करणारे जुलाल शामराव पाटील यांनी मला फोन करून सांगितले की, आपण शेतात ठेवलेले ठिबकच्या नळ्यांचे बंडल रात्रीच्या वेळेस चोरी झालेले दिसत आहे. तुम्ही लवकर या. असे सांगितल्याने मी लागलीच सदर शेतात जावून बघितले असता शेतातील निंबाच्या झाडाखाली ठेवलेले 16 ठिबकच्या नळ्या सुमारे 18 बंडल प्रत्येकी 600 मिटरचे असे निंबाच्या झाडाखाली दिसले नाही त्यामुळे त्यांची चोरी झाली .यासंदर्भात खात्री झाल्याने त्यानी अज्ञात चोरट्याविरुद्ध कायदेशीर फिर्याद दिली आहे. याप्रकरणी यावल पोलिस स्टेशनला तक्रार करण्यात आली.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह