⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | मी शेतकऱ्यांच्या पाठीशी, चोरट्यांना अंगाशी घालणार नाही : डॉ.प्रवीण मुंढे

मी शेतकऱ्यांच्या पाठीशी, चोरट्यांना अंगाशी घालणार नाही : डॉ.प्रवीण मुंढे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । दीपक श्रावगे । शेतकरी बांधवांच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा आहे, जर त्यांच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही. पोलिसांनी चोरांना अंगाशी घालू नये. चोर हा कोणत्याही समाजाचा नसतो तो चोरच असतो, त्याच्यावर कडक कार्यवाही करावी जेणेकरून अशा घटना घडणार नाही, अशा सूचना पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी केल्या.

सावदा येथून जवळ असलेल्या चिनावल-खिरोदा गावाच्या शिवारात गेले काही दिवसापासून केळी कापून फेकणे, ठिबक सिंचनचे संच जाळून टाकणे, विजेचे तार चोरून घेऊन जाणे अशा घटना घडल्या. त्यामुळे संतप्त शेतकरी बांधवांनी रास्तारोको आंदोलन केले होते. पोलिसांकडून योग्य कार्यवाही होत नाही अशी नागरिकांची ओरड होती. त्यामुळे आज पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी चिनावल येथे शेतकरी बांधवांची बैठक घेतली. याप्रसंगी ते बोलत होते.

बैठकीला माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, आ.राजूमामा भोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, बापू पाटील व चिनावल, खिरोदा, रोझोदा, वडगाव, सावदा येथील शेतकरी बांधव उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.