⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | दुर्दैवी : विद्यूत तार पडल्याने बैलासह शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

दुर्दैवी : विद्यूत तार पडल्याने बैलासह शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२२ । बैलगाडीने शेतात जात असलेल्या शेतकऱ्याच्या बैलगाडीवर खंब्यावरील विद्यूत तार तुटून पडल्याने शेतकऱ्यासह एका बैलाचा जागीच जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना समोर आली आहे. यावल तालुक्यातील चिखली बुद्रुक शिवारात ही धक्कादायक घटना आज सकाळी साडे आठच्या सुमारास घडली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यशवंत कामा महाजन (वय ६२, रा. चिखली बुद्रुक ता. यावल) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. यशवंत कामा महाजन हे चिखली येथे आपल्या परिवारासह राहत होते. शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे गुरूवार १ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास यशवंत महाजन हे बैलगाडीने चिखली बुद्रुक शिवारातील आपल्या शेतात रस्त्याने जात असतांना अचानक विद्यूत खंब्यावरील तार तुडून बैलगाडीवर पडली. यात वीजेच्या तीव्र झटक्याने यशवंत महाजन आणि एक बैल जागीच ठार झाल्याची दुदैवी घटना घडली.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व वायरमन यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरूवातील विद्यूत प्रवाह बंद करण्यात येवून त्यांना तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. या दुर्देवी घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मुकेश सानप करीत आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह