६ कोटी ५० लाखांच्या निधीतून रस्त्यांचे डागडुजीकरण होणार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२१ । शहरातील रस्त्यांच्या डागडुजीसाठी मनपा प्रशासनाने प्रत्येक प्रभागासाठी ५० लाख प्रमाणे नऊ कोटी ५० लाखांचा वेगवेगळे दिले होते. त्यापैकी केवळ तीन कोटीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित फंडातून आता हे काम करण्यात येणार आहे.

 

 

पावसाळा आला की खड्डे आणि चिखल हे जळगाव शहरातील नागरिकांच्या पाचवीला पुजले आहे. दर वेळेला जळगावकरांनी या खड्ड्यात बाबत आक्रोश केला की, महानगरपालिकेच्या प्रशासनाला जाग येते आणि रस्ते डागडुजी करणाला सुरुवात होते. भारती सोनवणे या महापौर असताना जळगाव शहरासाठी साडेनऊ कोटी रुपयांचे खड्डे डागडुजी करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र सर्वात हास्यास्पद गोष्ट म्हणजे त्यातील केवळ आणि केवळ साडेतीन कोटी रुपयांचा निधी त्यावेळेस रस्ता डागडुजी करण्यासाठी वापरला होता. साडेसहा कोटी रुपयांच्या शिल्लक निधीमधून आता डागडुजीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

 

प्रशासन आणि नगरसेवकांचा ठेकेदारांवर वचक नाही

जळगाव शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी साडेनऊ कोटीचा निधी देण्यात आला होता मात्र त्यातील केवळ ९.५ टक्केच काम पूर्ण झाले आहे. काम अपूर्ण राहण्यामागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे मनपा प्रशासनाचा आणि स्थानिक नगरसेवकांचा या ठेकेदारांवर नसलेला अंकुश. गतवर्षी ठेकेदारांनी निकृष्ट कामे केली मात्र या ठेकेदारांवर कोणीही अंकुश ठेवला नाही म्हणून या ठेकेदारांनी निकृष्ट काम केले आहे. गेल्याच आठवड्यात झालेल्या बैठकीमध्ये उपमहापौर कुलभूषण पाटील व महापौर जयश्री महाजन यांनी याप्रकरणी सर्व अधिकाऱ्यांची कानउघडणी केली होती.

 

त्या ठेकेदाराची बाजू सुद्धा समजून घेण्याची गरज

जळगाव मनपा निधीतून केल्या जाणाऱ्या विकासकामांसाठी ठेकेदाराला ठरलेली रक्कम वेळेवर दिली जात नाही असा जळगाव मनपाचा इतिहास आहे. जळगाव महानगरपालिकेने वेळोवेळी ठेकेदारांना ती रक्कम अदा केली तर ठेकेदार देखील उत्साहात काम करतील. रस्ते डागडुजीचे ठेकेदारांनी तीन कोटीचे काम पूर्ण केले होते त्यातील दीड कोटी महापालिका ठेकेदारांना देणे लागते मात्र मनपाने ते दीड कोटी देखील अजून ठेकेदाराला दिले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -