fbpx

५ लाखांसाठी विवाहीतेचा छळ ; ८ जणांविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२१ । नव्या व्यवसायासाठी माहेरहुन ५ लाख रुपये आणावे. या कारणावरुन विवाहीतेचा शारिरीक व मानसिक छळ होत असल्याने वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पिडीतीने सासरच्या ८ जणांविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल केला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कविता महेश सोनवणे हिचा गेया ६ वर्षांपासून सासरच्या मंडळींकडून शारिरीक व मानसिक छळ होत होता. तसेच माहेरहुन व्यवसायासाठी ५ लाख रुपये आणावे अशी मागणीही वारंवार होत असल्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहीतेने पाचोरा पोलिसात महेश पंढरीनाथ सोनवणे (पती), पंढरीनाथ सदा सोनवणे (सासरा), मथुराबाई पंढरीनाथ सोनवणे (सासु), सुनिल पंढरीनाथ सोनवणे (जेठ), अनिता सुनिल सोनवणे (जेठाणी), निर्मलाबाई जिभाऊ सुर्यवंशी (ननंद), जिभाऊ सुर्यवंशी (नंदोई), बंटी जिभाऊ सुर्यवंशी (भाचा) सर्व रा. राजीव गांधी काॅलनी, पाचोरा अशा ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पो. हे. काॅ. अजय मालचे हे करीत आहेत

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज