५० किलो लिंबूचा घोटाळा, कारागृह अधिक्षकला गमवावी लागली नोकरी

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । पंजाबमध्ये ५० किलो लिंबू घोटाळा केला म्हणून कपूरथला मॉडर्न जेलचे अधीक्षक गुरनाम लाल यांना निलंबित करण्यात आले आहे.कारागृहातील लिंबू घोटाळ्यामुळे तुरुंगमंत्री हरजोत बैंस यांच्या आदेशानुसार एडीजीपी कारागृह वरिंदर कुमार यांनी गुरनाम लाल यांना निलंबित केले आहे. याबाबाद अधिक माहिती अशी कि,

कारागृह अधीक्षकांनी रेशन खरेदीमध्ये ५० किलो लिंबू दाखवले होते, तेव्हा बाजारात लिंबाचा भाव २०० रुपयांपेक्षा जास्त होता. मात्र, त्या कैद्यांनाही हे लिंबू मिळाले नाहीत. चौकशीसाठी समिती पोहोचल्यावर त्याचं बिंग फुटलं. त्यावेळी कैद्यांनी लिंबू मिळत नसल्याचे सांगितले. देशात लिंबूचे भाव गगनाला भिडलेले असताना १५ ते ३० एप्रिलदरम्यान लिंबू खरेदी दाखवण्यात आली. या प्रकरणातील तपासादरम्यान गैरव्यवहारासह अनेक गैरप्रकारही समोर आले आहेत. पीठातही गैरव्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे.

कारागृहातील कैद्यांना योग्य आहार देण्याच्या अनियमिततेसाठी कारागृह अधीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. डीआयजीच्या नेतृत्वाखालील एका पथकाने या अनियमिततेची चौकशी केली होती, ज्यामध्ये असे आढळून आले की कपूरथळा कारागृहातील कैद्यांना निर्धारित नियमांनुसार योग्य आहार दिला जात नाही. नोंदीनुसार, कैद्यांसाठी लिंबूही मागविण्यात आले होते, परंतु ते सापडले नाहीत.” तरुंग अधिकाऱ्याने 50 किलो लिंबू खरेदी केल्याचे दाखवले होते मात्र, लिंबू स्वयंपाकघरात वापरले जात नसल्याचं कैद्यांनी सांगितलं. अशी माहिती कारागृह अधिकारी वीरेंद्र कुमार यांनी दिली.