⁠ 
मंगळवार, डिसेंबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | धरणगाव | २ हजारांची लाच भोवली, गटशिक्षणाधिकाऱ्यासह एक जाळ्यात

२ हजारांची लाच भोवली, गटशिक्षणाधिकाऱ्यासह एक जाळ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२२ । आरटीईच्या माध्यमातून मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी अनुकूल अहवाल दोन हजार रूपयांची लाच मागणाऱ्या गटशिक्षणाधिकारी यांच्यासह एकाला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. धरणगाव येथे झालेल्या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांच्या मालकीची पाळधी खुर्द येथे शाळा आहे. आरटीईच्या माध्यमातून विद्यार्थ्यामागे ८ हजार रूपये असे एकुण १७ विद्यार्थ्यांप्रमाणे एकुण १ लाख ३६ हजार रूपयांची अनुदानाची रक्कम मंजूर होण्यासाठी अनुकुल अहवाला सादर करण्यासाठी २ हजार रूपयांची मागणी गटशिक्षणाधिकारी अशोक दामू बिहाडे रा. राधाकृष्ण नगर, पिंपळे रोड अमळनेर आणि विभगातील कर्मचारी तुळशीराम भगवान सैंदाणे रा. रा. बोरोले नगर, पंडीत कॉलनी, चोपडा. ता.चोपडा, जि. जळगाव यांनी ३० डिसेंबर रोजी २ हजार रूपयांची लाचेची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांच्याकडून सोमवारी २४ जानेवारी रोजी गटशिक्षणाधिकारी यांच्या सांगण्यावरून तुळशीराम सैंदाणे याने २ हजार रूपये घेतांना जळगाव लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे.

‘या’ पथकाने केली कारवाई

पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव, स.फौ. दिनेशसिंग पाटील, स.फौ. सुरेश पाटील, पोहेकॉ अशोक अहीरे, पोहेकॉ सुनिल पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे, पोहेकॉ शैला धनगर, पोना मनोज जोशी, पोना सुनिल शिरसाठ, पोनाजनार्धन चौधरी, पोकॉ प्रविण पाटील, पो.कॉ. महेश सोमवंशी, पो. कॉ. नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, कारवाई केली.

author avatar
Tushar Bhambare