fbpx

११ बैलांची अवैध वाहतूक, ४ जणांना अटक

जळगाव लाईव्ह न्यूज | २१ सप्टेंबर २०२१ |  जिवंत बैलांना कत्तलीसाठी नेण्यात या उद्देशाने चार वाहनातून अवैध वाहतूक करतांना एरंडोल तालुका विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी२१ सप्टेंबर २१ पहाटे तीन वाजेच्या सुमारास रंगेहात पकडले . पशुधनास सह चारही वाहने पोलिसांनी जप्त केली विशेष हे की जवळपास महिनाभरात पशुधनाच्या अवैध वाहतुकीची केलेली ही पाचवी कारवाई आहे.

 

mi advt

याबाबत एरंडोल पोलिस स्टेशनच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की तुषार प्रभुलाल गोपाल रहाणार हाडाखेड शिरपूर, राहुल संतोष गोसावी राहणार अहिल्यापुर तालुका शिरपूर, शहारुख उर्फ रहिम पटेल राहणार कंडारी तालुका धरणगाव, वसीम बाबु पटेल राहणार कंडारी तालुका धरणगाव या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रकाश बद्रीनाथ पाटील यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर वाहने धरणगाव कडून येऊन एरंडोल मार्गे नेरी कडे जात होते असे सांगण्यात आले. एका वाहनात ४ , दुसऱ्या वाहनात ३, व उर्वरित दोन्ही वाहनात प्रत्येकी दोन असे एकूण ११ बैलांची मुक्तता करण्यात आली. पुढील तपास एरंडोल पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक संदीप पाटील हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज