⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
Home | बातम्या | ११८२ जणांचे काम करत आहेत मनपाचे २०९ सफाई कामगार !

११८२ जणांचे काम करत आहेत मनपाचे २०९ सफाई कामगार !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२३ । जळगाव शहराची लोक संक्खा साडे पाच लाख इतकी आहे. अश्यात शहरात स्वच्छतेचा प्रश्न सातत्याने भेडसावत असल्याचे पहायला मिळत आहे. आता पावसाळ्याचे दिवस आहेत. वेळेवर स्वच्छता झाली नाही तर रोगराई पसरण्याचा धोका असतो.

शहराची लोकसंख्या व क्षेत्रफळ पाहता, शहरात शासन आदेशानुसार स्वच्छतेसाठी ११८२ सफाई कामगारांची गरज आहे. मात्र शहरात आजच्या घडीला २०९ कामगारांवरच काम केले जात आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने ५२३ जागा तातडीने भरण्याचे आदेश महापालिकेला दिलेले आहेत

अस असुन सुद्धा भरती केली जात नसल्याची बाब अखिल भारतीय सफाई मजदूर संघाचे अध्यक्ष अजय घेंगट यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिली आहे. वॉर्डनिहाय दैनंदिन रस्ते, गटार साफसफाई करण्याकरिता ४०० कामगार आहेत. रात्रीच्या कामासाठी आणखी ३५ कामगार वाढवून देण्याबाबत महापालिकेने कंत्राटदाराला पत्र दिले होते. मनपाचे २०९ कर्मचारी आहेत. ११८२ कर्मचाऱ्यांचा ताण या कर्मचाऱ्यांवर पडत आहे. असे पत्रात म्हटले आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह