हतनूर धरणाचे 20 दरवाजे पूर्ण उघडले

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२१ । हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज सायंकाळी 7 वाजता धरणाचे वीस दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. आज दि. 22 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता तापी नदीपात्रात 34785 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहेत.

धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.