fbpx

स्थलांतरीत कामगारांसाठी समुपदेशन व सुविधा केंद्राची स्थापना

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ एप्रिल २०२१ । कोविड-19 विषाणुच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर ब्रेक द चेन अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यातील स्थलांतरीत कामगारांकरीता सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, पहिला मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट, जिल्हापेठ, जळगाव येथे समुपदेशन व सुविधा केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे. सदर समुपदेशन व सुविधा केंद्रासाठी श्री. जितेंद्र पवार, दुकाने निरीक्षक यांची केंद्रप्रमुख म्हणुन नियुक्ती करण्यात आलेली आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 4 एप्रिल, 2021 रोजी नविन मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत. त्यानुसार कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दिनांक 5 एप्रिल 2021 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सींगव्दारे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी कामगार विभागाच्या कार्यालयामध्ये स्थलांतरीत कामगारांकरीता समुपदेशन व सुविधा केंद्र स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील विविध आस्थापना/ कारखाने  येथे काम करीत असलेले स्थलांतरीत/परप्रांतीय कामगार लॉकडाऊनमुळे त्यांच्या मुळगावी (मुळ राज्यात) जात असल्यास सदर कामगारांनी त्यांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक, आस्थापनेचे नाव व पत्ता इत्यादी माहिती कार्यालयाच्या [email protected] या ईमेल वर पाठविण्यात यावी. तसेच परराज्यात काम करीत असलेले जळगाव जिल्ह्यातील कामगार हे लॉकडाऊनमुळे जळगाव जिल्ह्यात मुळ गावी परत आलेले/येत असल्यास सदर कामगारांनी देखील त्यांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक, आस्थापनेचे नाव व पत्ता इत्यादी माहिती कार्यालयाच्या [email protected] या ईमेल वर पाठविण्यात यावी.

स्थलांतरीत कामगारांनी त्यांच्या आरोग्य विषयक समस्यांबाबत मोफत टोल फ्री क्रमांक 104 वर संपर्क साधावा. तसेच स्थलांतरीत कामगारांना काही अडचणी/प्रश्न असल्यास या कार्यालयातील श्री. जितेंद्र पवार, केंद्र प्रमुख यांच्याशी कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक 0257- 2239716 वर संपर्क साधावा. असे आवाहन श्री. चं. ना. बिरार, सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज