सावद्याचे कैलास लवंगडे शिवाभूषण पुरस्काराने सन्मानीत

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२२ । महाराष्ट्र, तेलंगना, आंध्र प्रदेश व कर्नाटक मधील लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या बीड जिल्ह्यातील कपलीधार येथे नुकताच शिवा संघटनेचा राष्ट्रीय स्तरावरील ‘शिवा भूषण पुरस्कार’ समारोह झाला. राज्याचे सहकार मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्याहस्ते व शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडे यांची प्रसंगी उपस्थिती होती. लिंगायत समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणार्‍यानां पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यांची समारोहास उपस्थिती
यावेळी लिंगायत समाजाचे राष्ट्रीय संत शिवाचार्य महाराज अहमदपूरकर, गुरुवर्य शिवानंद शिवाचार्य महाराज, गुरुवर्य महादेव स्वामी महाराज गुरुवर्य म्हैसाळकर महाराज, शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडे यांच्या उपस्थितीत संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरात शासकीय पूजा झाली. सहकार मंत्री अतुल सावे व प्रमुख मान्यवरांचे हस्ते शिवा भूषण राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले यात पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे जळगाव जिल्ह्यातील पत्रकार कैलास लवंगडे यांना देखील शाल श्रीफळ व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.