fbpx

साडी बदलून येते असे सांगत बहाळ येथून विवाहिता बेपत्ता

mi-advt

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथील विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना १ सप्टेंबर रोजी घडली.  सायंकाळी ५च्या सुमारास  हि घटना घडली. याप्रकरणी मेहुणबारे पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की भूषण सोनू ठेंगे राहणार बहाळ तालुका चाळीसगाव यांची पत्नी सविता सोनू ठेंगे १ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास साडी घेण्यासाठी जाते आणलेली साडी बदलून आणते असे सांगून घरून निघाली मात्र पुन्हा आली नाही. उशीर झाल्यामुळे घरातल्यांनी शोध सुरू केला. इतरत्र सर्व ठिकाणी शोध घेऊन देखील त्यांना सदर महिलेचा शोध न लागल्यामुळे भूषण ठेंगे यांनी दिलेल्या माहितीवरून मेहुणबारे पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत चौकशी पोलिस प्रशासन करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज