fbpx

समता सैनिक दलाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपन्न

mi-advt

 

कर्नाटकचे मा.सुनील कांबळे यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड…..

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२१ । दि. 21 व 22 ऑगस्ट 2021  रोजी कल्याण येथे समता सैनिक दल व रिपाई सोशल च्या त्रैमासिक बैठकित ससैद राष्ट्रीय तथा राज्य कार्यकारीणीच्या फेरनिवडीची महत्त्वपुर्ण बैठक संपन्न झाली . बैठकीच्या अध्यक्षस्थानी रिपाई सोशल चे राष्ट्रीय अध्यक्ष मेघराज काटकर होते.
सुरूवातीस ससैदलाचे मावळते अध्यक्ष राजा कदम यांनी त्यांच्या कार्यकिर्दित केलेल्या कामाचा गोषवारा मांडून सभागृहासमोर रितसर राजीनामा सादर केला. तो कार्यकारीणी ने स्विकारून खालीलप्रमाणे नुतन कार्यकारीणी एकमताने निवडण्यात आली.
यावेळी अध्यक्षपदी सुनिल कांबळे बेळगावी, कर्नाटक, उपाध्यक्ष भानु चव्हाण सुरत,गुजरात, महासचिव मिलिंद शामकुरे, कोषाध्यक्ष  बौध्द गणसिंह, सचिव  दिपक वांटे,बेळगावी ,  संघटक  धर्मभुषण बागूल, सदस्य  राजा कदम, प्रमोद सदांशिव, रविंद्र तायडे लखनऊ, दिनेश मकवाना सुरत गुजरात, धम्मपाल दामले यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रीय कार्यकारीणी ने महाराष्ट्र राज्य समता सैनिक दलाच्या अध्यक्षपदि रितेश अंभोरे लोनावळा यांची फेरनिवड केली तसेच कार्यकारीणी बनविण्याचे सर्व अधिकार त्यांनाच बहाल केले. लवकरच राज्य कार्यकारिणी जाहीर केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नागपुर, मुंबई, अकोला, जळगाव, चाळीसगाव,भुसावळ, पुणे आदी ठिकाणाहून प्रमुख पदाधिकारी उपस्थीत होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज