गुरूवार, जून 8, 2023

सचिनच्या चिरंजीवाचे आय.पी.एल मध्ये प्रदार्पण !

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२३ ।  आयपीएल २०२३ स्पर्धेतील २२ वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे.

अर्जुन तेंडुलकरला २०२३ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्स संघाने ३० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. मात्र त्याला एकही सामन्यात खेळण्याची संधी दिली गेली होती. आज सुरु असलेल्या सामन्यात सूर्यकुमार यादव नाणेफेक करण्यासाठी आला आणि त्याने अर्जुन तेंडुलकर खेळणार असल्याची माहिती दिली.

मुंबई इंडियन्स:

इशान किशन (विकेटकीप), कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार ), टिम डेव्हिड, नेहल वढेरा, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, पियुष चावला, दुआन जॅनसेन, रिले मेरेडिथ

कोलकाता नाईट रायडर्स:

रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, एन जगदीसन, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती