Friday, December 9, 2022

संजय बियाणी यांचा खून करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या – जिल्हा माहेश्वरी सभा

जळगाव लाईव्ह न्युज | ४ एप्रिल २०२२ । नांदेड येथे माहेश्वरी समाजाचे कार्यकर्ते बिल्डर संजय बियाणी यांचा मंगळवारी दिवसाढवळ्या खून झाला. बियाणी यांचा खून करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा व्हावी यासाठी जळगाव जिल्हा माहेश्वरी सभेतर्फे जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे यांना देण्यात आले.

- Advertisement -

निवेदनात लिहिले होते की, संजय बियाणी हे थोर सामाजिक कार्यकर्ते होते त्यांनी नुकतेच नांदेड येथील माहेश्वरी समाजाच्या गरजू बेघर लोकांसाठी 21 रो हाऊसेस व 52 सदनिका अत्यंत अल्पदरात उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यांच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत होता. अशा नागरिकाचा खून होणे ही अतिशय निंदनीय बाब आहे.

माहेश्वरी समाजाचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते या घटनेचा तीव्र निषेध करत आहे. माहेश्वरी समाज आपल्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचे चरितार्थ चालवणारा पायाभूत समाज आहे. यामुळे या घटनेची कितीही मोठ्याप्रमाणात निंदा केली तरी ती कमीच आहे. घडलेल्या घटनेची सखोल चौकशी होऊन खरे गुन्हेगार शोधून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी श्यामसुंदर सोनी नारायण लाठी नितीन लढ्ढा, माणकचंद जवळ व इतर महेश्वरी समाजातले बांधव उपस्थित होते.

- Advertisement -
[adinserter block="2"]