शेतकऱ्याला मिळत नाही भाव : १०० किलो वांग्यांमागे मिळाले ६६ रु

जळगाव लाईव्ह न्यूज : १ मार्च २०२३ : भारत हा कृषिप्रधान देश आहे. अस आपण नेहमीच ऐकत असतो. भारतामध्ये शेतकऱ्यांना देवाचं स्थान आहे असेही म्हटले जाते. मात्र त्याच बळीराजाला सध्या स्वतःच्या शेत मालाला भाव मिळवून देणं खूप कठीण झालं आहे. एका शेतकऱ्याला शंभर किलो वांगी विकली तेव्हा केवळ 66 रुपये मिळाले आहेत.

काही दिवसांपूर्वी आपण एक बातमी ऐकली असेल ती म्हणजे 800 किलो कांद्याच्या बदल्यात शेतकऱ्याला केवळ दोन रुपये मिळाले आता त्यात भर पडली असून एका शेतकऱ्याला शंभर किलो वांग्याच्या ऐवजी केवळ 66 रुपये मिळाले आहेत. पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण या ठिकाणी या शेतकऱ्याचे वास्तव्य आहे.

पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केटमध्ये वांग्याच्या विक्रीसाठी हा शेतकरी आला होता. शेतकऱ्याने अकरा गुंठे शेतीवर वांग्याचे पीक लावले होते. यामुळे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हाथबलं आहे. तीन महिने कष्ट करून पीक पिकवायच आणि त्याला भाव मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी जगावं तरी कस? असा प्रश्नच त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. याकडे लक्ष द्यावं सरकारने याकडे लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांना हमीभाव कसा मिळेल? याकडे पहाव अशी विनंती राज्यातील सर्वच शेतकरी करत आहेत.

याचबरोबर जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुमारे 200 क्विंटल कांद्याची आवक झाली. या कांद्याला 400 ते 800 रुपये क्विंटन म्हणजे चार ते आठ रुपये किलो पर्यंत भाव मिळाला. असं असूनही खर्च आणि वाहतूक खर्च निघणे कठीण आहे. यामुळे शेतकऱ्याला किलोमागे चार ते आठ रुपये मिळत असल्यामुळे शेतकरी प्रचंड नाराज आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे