fbpx

शिवाजीनगरात रौद्र शंभो संस्थेतर्फे गणेशमूर्ती संकलन

 

 

mi advt


जळगाव लाईव्ह न्यूज | १९ सप्टेंबर २०२१ |  शहरातील शिवाजी नगर परिसरात रौद्र शंभो बहुद्देशीय संस्थेतर्फे घरगुती गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले.

 

अनंत चतुर्थीच्या दिवशी शहरात बाप्पाला जल्लोषात निरोप देण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ठिकठिकाणी गणेश मूर्ती आणि निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली होती. शिवाजी नगरात रौद्र शंभो बहुउद्देशीय संस्थेतर्फे घरगुती गणेश मूर्ती संकलित करण्यात आल्या. दिवसभरात २ वेळा ट्रॅक्टर भरून गणेश मूर्ती आणि निर्माल्य जमा करण्यात आले. उपक्रमासाठी भगवान सोनवणे, तुषार सूर्यवंशी, निशांत काटकर, नरेश शिंदे, जयेश इंगोले आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज