शिवसेनेच्या शाखांना हाथ लावाल तर याद राखा; शिवसेना महिला आघाडी आक्रमक

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२२ । शिवसेनेच्या महिला नेहमीच समाजासाठी सर्व स्तरावर काम करत असतात. उद्धव ठाकरे यांच नेतृत्व बळकट करण्यासाठी आम्ही नेहमीच काम करत असतो. मात्र सत्तेला हापापलेल्या गद्दारांकडून आमच्या मार्गात अडथळे आणले जात आहेत. मात्र आमच्या शाखांना हात लावण्याचे स्वप्नही त्यांनी पाहू नये. कारण तसं केल्यास राक्षसांचा अंत करायला आम्हाला दुर्गेचे रूप घ्यायला भाग पडाव लागेल. असा इशारा शुभांगी पाटील यांनी दिला आहे.

शुभांगी पाटील यांना नुकतेच शिवसेना महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुख पदी नियुक्त करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर पाटील यांनी उत्तर महाराष्ट्रातील संघटनात्मक कामकाजाला सुरुवात केली आहे.उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी असल्याने त्या सर्व पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. याची सुरुवात त्यांनी धुळे जिल्ह्यात केली आहे.

जळगाव लाईव्ह शी बोलताना त्या म्हणाल्या की स्त्री किंबहुना महिला या सरस्वतीच रूप आहे असं म्हटलं जातं. मात्र आम्ही दुर्गेचाही रूप आहोत जर आमच्या शाखांना कोणीही हात लावायचा प्रयत्न केला तर आम्ही दुर्गेच रूप घेऊ.

याचबरोबर एका स्वायत्त वृत्त संस्थेची बोलताना त्या म्हणाल्या होत्या की, सध्या सत्तेवर असल्यामुळे शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेण्याचा विचार कामही लोक करत आहेत. विधिमंडळाचे कार्यालय त्यांनी सत्तेच्या आशीर्वादाने हिसकवले आहे. शिवसेनेच्या महिला सध्या सरस्वती म्हणून योग्य मार्ग शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र शाखांवर त्यांची नजर गेली तर या रणरागिणी दुर्गा होतील व शाखेवर नजर टाकणाऱ्या रक्षकरांना धडा शिकवतील.