शिवसेना राणेंना घाबरली म्हणून त्यांना अटक केली : आ.राजुमामा भोळे

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२१ । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे तो बघता जर नारायण राणे कोकणात गेले तर शिवसेनेला मोठी हानी होईल. त्याच बरोबर राणे यांच्याकडून ज्याप्रकारे गणपतीसाठी मोफत रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या याचा धसका घेत त्यांना घाबरत शिवसेनेने नारायण राणे यांना अडकवून अटक केली असल्याची प्रतिक्रिया आमदार राजुमामा भोळे यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना दिली.

आमदार भोळे पुढे म्हणाले की, नारायण राणे यांनी ज्या प्रकारचे उत्तर दिलं ते उत्तर हा त्यांचा स्वभाव आहे. यामुळे त्यांनी मोठा असा कोणताही गुन्हा केलेला नाही. अशा वेळेस नारायण राणे यांना जाणून-बुजून अडकवलं जात आहे. मी मुंबईला असल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या मोर्चा आणि आंदोलनाला उपस्थित राहू शकलो नाही. जळगावात आज जो प्रकार घडला त्याचा मी निषेध करतो असेही यावेळी भोळे यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -