शिवजयंती निमित्त ‘ड्राय डे’ घोषित करावा : अखिल भारतीय मराठा महासंघ

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ फेब्रुवारी २०२३ । १९ फेब्रुवारी २०२३ रोजी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असुन त्या दिवशी शिवजन्मोत्सव हा संपूर्ण हिंदुस्थानात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

तरी ज्या प्रमाणे राष्ट्रीय दिन, उत्सवात कुठलाही गालबोट लागू नये या कारणास्तव ‘ड्राय डे’ घोषित केला जातो त्याच प्रमाणे १९ फेब्रुवारी २०२३ वार रविवार रोजी शिवजन्मोत्सवा निमित्त संपूर्ण जिल्हाभरात ड्राय डे घोषित करावा ही असे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघ जळगांव तर्फे देण्यात आले.

यावेळी प्रतीक पाटील, पियुष पाटील , गणेश निंबाळकर, अजय पवार, प्रसाद पाटील, तन्मय पाटील, नयन चौव्हाण , रितेश पाटील, विपुल पाटील , दीप पाटील, महेश पाटील उपस्थित होते.