जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । शिरसोली येथे रामनवमीनिमित्त साने गुरुजी फाउंडेशन संचलित पद्मालय इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रथावरून मिरवणूक काढली. यावेळी ग्रामस्थांकडून पूजन करण्यात आले.
रथावर चिमुकले राम, लक्ष्मण, सीता व हनुमान विराजमान झाले होते. रथाचे सारथ्य हनुमानाने केले होते. मिरवणुकीच्या पुढे विद्यार्थिनींनी दांडिया सादरीकरण केले. शोभायात्रेत वानरांचा पेहरावासह विद्यार्थी सहभागी झाले होते. मिरवणुकीत संस्थेच्या अध्यक्षा भारती बारी, प्राचार्या स्वाती चौधरी, प्रतिभा शिवरामे, संगीता बारी, वैशाली जळके, ज्योती पाटील, सुनंदा बारी, ज्योती भारुडे, नीता सूर्यवंशी, मनीष पाटील, हेमंत नेमाडे, उदय नाईक, निषादराज बारी, द्वारकाबाई पाटील यांनी सहभाग घेतला होता.
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज