शिंदेंचा ठाकरेंना अजून एक धक्का : वाचा काय आहे प्रकरण

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२२ ।  संपूर्ण राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडताना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी आगामी ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. स्थानिक पातळीवर हा धक्का दिला आहे. करबुडेतील ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख प्रवीण पांचळ यांनी तसेच गोळप जिल्हा परिषद गटाचे विभागप्रमुख नंदा मुरकर यांनीही शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.

रत्नागिरी ग्रामपंचायत निवडणूक आवघ्या काही दिवसांवर असताना उदय सामंत यांनी स्थानिक निवडणूकीत उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे. उपतालुका प्रमुख आणि विभाग प्रमुखांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला आहे. करबुडेतील ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख प्रवीण पांचळ यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.


तसेच गोळप जिल्हा परिषद गटाचे विभागप्रमुख नंदा मुरकर यांनीही शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. तालुक्यातील अन्य भागांतील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात पक्षात प्रवेश केला. याचबरोबर १७ शाखाप्रमुख, सदस्य आदींचा यामध्ये प्रवेश आहे. ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सेनेला हा मोठा धक्का आहे. उदय सामंत यांनी ठाकरे सेनेला या दौऱ्यात चांगलेच खिंडार पाडल्याने सेनेत अस्वस्थता आहे.