fbpx

शामाप्रसाद मुखर्जी व्यापारी संकुलातील गाळेधारकांचे ‘भीक मांगो’ आंदोलन !

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२१ । मनपाने गाळेधारकाविरोधात सुरु केलेल्या कारवाईच्या निषेर्धात शहरातील १६ व्यापारी संकुलांतील गाळेधारकांनी बेमुदत संप पुकारला असून अद्यापही तोडगा निघालेला नसल्याने आज बुधवारी शामा प्रसाद मुखर्जी व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी भीक मांगो आंदोलन करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

मनपाने गाळेधारकाविरोधात सुरु केलेल्या कारवाईच्या निषेर्धात शहरातील १६ व्यापारी संकुलांतील गाळेधारकांनी बेमुदत संप पुकारला आहे. जळगाव महापालिकेचे आयुक्त सतीश कुळकर्णी हे महानगरपालिकेचे कर्ज, रस्ते दुरूस्ती, इलेक्ट्रिक बिले भरणे, अधिकारी व कर्मचारी यांचे पगार करणे असल्यामुळे वारंवार गाळेधारकांना धमकावून पैसे वसूल करत आहे. त्यामुळे जळगाव शहरात गाळेधारकांनी बेमुदत बंद पुकारले आहे. कोरोना महामारीत गाळेधारकांची परिस्थीत नाजूक आहे. या परिस्थितीमुळे महापालिका सक्तीची वसुली करत आहे. वारंवार पैश्यांसाठी तगादा लावत असल्यामुळे गेल्या २७ मार्च पासून बेमुदत संपावर आहे. संपाचा आज पाचवा दिवस उजाळला परंतू अद्याप शहरातील १६ व्यापारी संकुलाचा प्रश्न मार्गी लागला नाही. महापालिकेचा निषेध करण्यासाठी आज श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानासमोर गाळेधारकांनी भिकमांगो आंदोलन केले.

या भिक मांगो आंदोलनातून  जे काही पैसे जमा होती त्या पैश्यातून आयुक्तांनी शहराचा विकास करावा असे  देखील त्यांनी सांगितले. याप्रसंगी राजू देसले, गणेश जगताप, कल्पेश सोनी, वसंत भावसार, मयूर पवार, राजेंद्र बाविस्कर, शबीर शेख सय्यद, बाबू परदेशी, रवींद्र मोरे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज