‘व्हॅलेंटाइन डे’ निमित्त जळगावात इतक्या जोडप्यांनी केला विवाह

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ फेब्रुवारी २०२३ । व्लेटाइन ‘डे’ म्हणजेच प्रेम दिन. आणि हाच दिवस कायम स्वरूपी लक्षात राहावासाठी गेल्या काही वर्षांपासून १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी लग्नाचा धूमधडाका उडवण्याची क्रेझ वाढली आहे. या दिवशी पंचांगानुसार लग्न मुहूर्तही असल्याने शुभमंगल म्हणत अनेक जोडपी आज बोहल्यावर चढली.

या वर्षी जळगावमध्ये तब्बल २० प्रेमी युगल ‘व्हॅलेंटाइन डे चा मुहूर्त साधत लग्नाच्या बेडीत कैद झाली आहेत.

कोरोना महामारीचे निर्बंध उठल्याने यंदा १४ फेब्रुवारीला निर्बंधमुक्त वातावरणात व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी आहे. यामुळे आज अनेक जण विवाह बंधनात अडकले आहेत. अनेक मंगल कार्यालये गजबलेली दिसली. याच बरोबर जोडप्यांना जास्त वेळ ताटकळत न ठेवता त्यांचा हा दिवस खास बनविण्यासाठी नोंदणी कार्यालयही सज्ज होते.

गेल्या वर्षी कोरोनाचे सावट होते. मात्र तेव्हाही ११ जोडप्यांनी ‘व्हॅलेंटाइन डे’ ठा लग्नाचा बार उडविला होता. या वर्षी देखील १० जोडप्यांनी १४ फेब्रुवारीस लग्न करण्यासाठी पसंती दाखवली.