fbpx

वीज पडून महिलेचा मृत्य

 

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२१ । रावेर तालुक्यातील विवरा खुर्द येथे वीज पडून शेतमजूर महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. दुपारी चारच्या सुमारास वीज पडून महिला ठार झाल्याची घटना घडली. सुदैवाने शेजारीच असलेली भाची आणि २ मुले यांना कोणतीही इजा झाली नाही.

mi advt

या बाबतची अधिक माहिती अशी की, विवरे खुर्द येथील माजी सरपंच कविता राजेंद्र पाटील यांच्या शेतात वाघेला हे आदिवासी शेतमजूर कुटुंब झोपडीतच रहात होते. दुपारी चारला पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी नूरकी वाघेला (वय ३५ वर्ष) ही महिला शेजारच्याच विहिरीवर गेली असता तिच्या अंगावर वीज कोसळून ती जागीच ठार झाली.

शेजारीच असलेल्या झोपडीत तिची भाची रोशनी ( वय ९ वर्षे), मुलगा राहुल (वय ७ वर्षे) आणि मुलगी रवीना ( वय ३ वर्ष) यांना सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. याच शेतात दुसऱ्या बाजूला काम करणारा तिचा पती देखील सुदैवाने बचावला आहे. वीज पडलेला महिलेला तातडीने रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र तत्पूर्वीच तिचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज