विशेष कर्जावरील व्याजदर होणार कमी

जळगाव लाईव्ह न्यूज | २७ सप्टेंबर २०२१ | कविड महामारी मुळे ग स सोसायटीमधील सर्व सभासदांवर आर्थिक ताण आला आहे. यामुळे व्याजदर दोन टक्क्याने कमी करावा अशी मागणी लोकमान्य पॅनल ने केली होती. पुढील महिन्यापासून व्याजदर कमी करण्याचे आश्वासन संस्थेच्या प्राधिकृत मंडळाने दिले आहे.

यावेळी लोकमान्य गटाकडून मांडण्यात आलेल्या मुद्यांबाबत सदस्य पाटील यांनी माहिती दिली तसेच 15.5 कोटींचा विक्रमी नफा झाल्याचे सांगत संस्थेचे अभिनंदन केले.

ग स सोसायटी ची 112 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने रविवारी पार पडली . दरम्यान या सभांमध्ये सभासदांना आयडी न मिळाल्याने कित्येक सभासदांना सहभागी होता आले नाही त्यामुळे त्यांची नाराजी आहे. ज्या सभासदांच्या जीवावर सोसायटी उभी आहे त्यांनीच अशाप्रकारे प्रतारणा करणे योग्य नसल्याचे शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ पाटील म्हणाले.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज