विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत महापौरांनी केले मतदान

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२३ । जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर जयश्री महाजन यांनी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकित मतदानाचा हक्क बजावला.

विद्यापीठ विकास मंच वि विद्यापीठ महाविकास आघाडी अशी लढत विद्यापीठाच्या या निवडणुकीमध्ये पाहायला मिळत आहे. दोन्हीही बाजूने ही लढत अतिशय प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. यात कोण बाजी मारेल हे येत्या दोन तारखेला म्हणजेच 2 फेब्रुवारी रोजी समजणार आहे. मात्र या निवडणुकीच्या मतदानावेळी जळगाव शहराच्या प्रथम नागरिक महापौर जयश्री महाजन यांनी मतदान केले.