fbpx

वरणगावात शिक्षक उतरले रस्त्यावर

जळगाव लाईव्ह न्यूज। २१ सप्टेंबर २०२१ । शहरातील बोदवड रस्त्यावर असलेल्या महात्मा गांधी विद्यालयाच्या समोर आठवडे बाजार भरतो. कोरोना परिस्थिती लक्षात घेता या आठवडे बाजारामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याअनुशंघाने शाळेतील सर्व शिक्षकांनी रस्त्यावर उतरून आठवडे बाजार शाळे समोरून हटवला.

वरणगाव शहरातील महात्मा गांधी विद्यालयासमोर सध्या आठवडे बाजार भरला जात आहे. आठवीनंतरचे सर्व वर्ग या शाळेमध्ये आता सुरू आहेत. या आठवडे बाजारामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो. आठवडे बाजारातील व्यापाऱ्यांना सांगून देखील ते शाळेत समोरच गर्दी करून बसत असल्याने आज शाळेतील सर्व शिक्षक बाजारात उतरले आणि नगरपालिकेच्या अधिकारी आणि पोलिस प्रशासनाला मदत घेऊन हा आठवडी बाजार या ठिकाणाहून पाठवला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज