लष्कर ए तोयबाचा कमांडर मुख्तार भटला भारतीय सैन्याने घातले कंठस्नानलष्कर ए तोयबाचा कमांडर मुख्तार भटला भारतीय सैन्याने घातले

जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२२ । जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सैन्य दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. बिजबेहरा आणि अवंतपोरा या दोन ठिकाणी हि चकमक झाली. यावेळी तीन दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे याचबरोबर दोन्ही ठिकाणी शोधमोहीम सुद्धा सुरू असल्याचे यांनी सांगितते .

ठार झालेल्या तीघा दहशतवाद्यांमध्ये लष्कर ए तोयबाचा कमांडर मुख्तार भट याचा समावेश आहे. तो एफटी सोबत जवानांच्या शिबिरावर हल्ला करण्यासाठी जात होता. पोलिसांनी या चकमकीनंतर एक एके-74 रायफल, एक एके-56, एक पिस्तुल आदी शस्त्रसाठा आपल्या ताब्यात घेतला आहे. लष्कर ए तोयबाचा कमांडर मुख्तार भट याचा सीआरपीएफचे एएसआय आणि दोन आरपीएफ जवानांच्या हत्येसह अनेक दहशतवादी गुन्ह्यांमध्ये सहभाग होता.

https://twitter.com/ANI/status/1587465520760385536?s=20&t=tyWEbjX7aOpnnJzQteTr0w