रिक्त पदभारामुळे रोजगार हमीच्या कामांचा खोळंबा

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२१ ।  तालुक्यातील ६२ ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या ७९ गावांची जबाबदारी केवळ एकाच तांत्रिक अधिकाऱ्यावर असल्याने रोजगार हमी योजनेच्या तब्बल तीन हजार कामांचा खोळंबा झालेला आहे.परिणामी सर्वसामान्य जनतेला पंचायत समिती कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहे.
पं.समिती अंतर्गत रोहयोची विविध कामे सुरू असुन प्रामुख्याने गुरांचे गोठे, वृक्षारोपण, घरकुल व इतर विविध कामे सद्यस्थितित सुरु आहे.जवळपास सुमारे तीन हजारावर कामे चालु असतांना पुरेशा प्रमाणात अधिकारी नसुन एकाच तांत्रिक पॅनल अधिकाऱ्याच्या खांद्यावर ६२ ग्रामपंचायतीची संपुर्ण जबाबदारी असल्याची वास्तविकता आहे.

यामुळे मस्टर काढणे,कामपाहणी तसेच विविध जबाबदारी सांभाळत असतांना अडचणींचा सामना करावा लागय आहे तसेच कामे पुर्ण करण्यासाठी तालुक्यातील नागरीकांचे ससेहोलपट होत असुन अनेकदा चकरा माराव्या लागत आहे.

पं.स.अंतर्गत तांत्रिक पॅनल अधिकारी यांचे पदे असून भुषण चंदने एकमेव टिपीओ अधिकारी कार्यरत आहे.तर डाटा एंट्री आॅपरेटरची दोन पदे रिक्त असुन साहायक कार्यकारी अधिकारी यांची दोन पदे असतांना केवळ एकच व्यक्ती कामे पहात आहे‌. अशाप्रकारे जवळपास सहा पदे रिक्त आहेत.परिणामी रोहयोच्या कामांना गती मिळत नसल्याची तक्रार ग्रामरोजगार सेवक व लाभार्थी करत आहे.
हि पदे तात्काळ भरण्यात यावी जेणेकरून हा त्रास कमी होईल.

“दोन तांत्रिक पॅनल अधिकारी,दोन डाटा आॅपरेटर आणि साहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांची रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत.”
संतोष नागटिळक, गटविकास अधिकारी

“संपुर्ण तालुक्यातील जबाबदारी माझ्या एकट्यावर असल्याने काम होण्यास विलंब होणे सहाजिकच आहे.तीन अधिकारी यांचे काम माझ्या एकट्यावर पडल्याने कामाचा ताण वाढला आहे”
भुषण चंदने,तांत्रिक पॅनल अधिकारी

“गेल्या तीन चार महिन्यांपासून केवळ एकच पॅनल अधिकारी असल्याने रोजगार हमीची कामे रखळली आहे.त्यामुळे रिक्त पदे तात्काळ पदे भरण्यात यावी.”
अमोल देशमुख, रोजगार सेवक

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज