युवक काँग्रेसची ‘बस थांबवा’ फलक लावण्याची मागणी

Yawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२२ । शहरातील विविध ठिकाणी ‘बस थांबवा’ चे फलक लावण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन युवक काँग्रेसतर्फे विभागीय नियंत्रक जळगाव यांना यावल आगार व्यवस्थापका द्वारे देण्यात आले.

शहरातील यावल ते चोपडा रस्त्या वर डॉ.झाकीर हुसेन शाळे जवळ, यावल ते फैजपूर रास्त्या वर कला वणी महाविद्यालय जवळ,यावल ते सतोद- कोलवद रस्त्यावर जी. प.शाळा जवळ
,यावल ते भुसावळ रस्त्यावर बजाज शोरुम जवळ,यावल ते भुसावळ रस्त्यावर भुसावळ नका जवळ असे पाच ठिकाणी “बस थांबवा” असे फलक लावण्याची मांग्णी युवक काँग्रेस तर्फे निवेदन द्वारे करण्यात आली. युवक काँग्रेस चे विधानसभा अध्यक्ष फैजान शाह,आदिल शेख,कपिल खान,सरफराज शाह,सय्यद आदिल,रफिक पटेल,हकीम शेख, इजान शेख,वसीम शेख,आवेश शेख आदी उपस्थित होते.