मालक आणि कर्मचाऱ्यांमधील नातं दृढ करणारा ‘राष्ट्रीय बॉस डे’

जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । बॉस आणि ऍम्प्लियी यांचं नातं काहीतरी वेगळंच असतं. मालक आणि कर्मचारी यांच्यातील संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने दि.१६ ऑक्‍टोबर रोजी राष्ट्रीय बॉस डे साजरा करण्यात येऊ लागला. आजच्या दिनविशेषबद्दल जाणून घेऊ खास माहिती..!

युनायटेड स्टेटमध्ये दरवर्षी 16 ऑक्टोबर रोजी सुट्टी असते. आणि हा दिवस सर्व आयुक्तांना समर्पित केला जातो. कर्मचाऱ्यांनी आपल्या मालकाची प्रशंसा करण्याची आणि वर्षभर दयाळू आणि निष्पक्ष राहिले याबद्दल त्यांचे आभार मानण्याची ही वेळ म्हणजे १६ ऑक्टोबर आहे.

काय आहे ‘बॉस डे’चा इतिहास?
हा इतिहास आहे १९५८ चा जेव्हा राष्ट्रीय बॉस डेची संकल्पना पेट्रीसिया बेज हॅरोस्की यांनी स्थापन केली होती, त्यानंतर डीरफील्ड, इलिनॉय येथील स्टेट फार्म इन्शुरन्स कंपनीमध्ये कर्मचारी होत्या. त्या वर्षी, पेट्रीसिया बेज हारोस्कीने युनायटेड स्टेट्स चेंबर ऑफ कॉमर्समध्ये सुट्टीची नोंदणी केली. तिने 16 ऑक्टोबर हा विशेष दिवस म्हणून नियुक्त केला कारण त्या दिवशी तिच्या वडिलांचा वाढदिवस होता, जो तिचा बॉस देखील होता. चार वर्षांनंतर 1962 मध्ये, इलिनॉयचे राज्यपाल ओटो केर्नर यांनी हॅरोस्कीच्या नोंदणीला पाठिंबा दिला आणि अधिकृतपणे त्या दिवसाची घोषणा केली.

अनेक देशात होतो साजरा
आज बॉस डे ला वाढती लोकप्रियता मिळवली आहे, केवळ अमेरिकेतच नव्हे तर जगभरात, तर आता ऑस्ट्रेलिया, भारत आणि दक्षिण आफ्रिका सारख्या देशांमध्ये देखील बॉस डे साजरा केला जातो.

दिवसेंदिवस वाढतेय क्रेझ
मालक आणि कर्मचारी यांच्यातील नात्याला घट्ट बनवण्या साठी हा दिवस साजरा केला जात असतो. इतर वेळेस मालकाची प्रतिमा हि अनेकांच्या मनात रागीट बनलेली असते, तर कामाच्या वेळेस दबाव टाकल्याने अनेकांना घरी बॉस शब्द जरी उच्चरला तर ऑफीस चा तणाव आठवतो तर काहींना बॉस म्हंटल तर बॉस चे बोलणे ऐकायला येत असतात. कामाचा दबाव प्रत्येक ठिकाणी नसला तरी बॉस ( मालक ) या शब्दाला  अनेक लोक घाबरतात. याच भीतीला पळवून लावण्या साठी १६ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय बॉस डे साजरा केला जात असतो.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज