---Advertisement---
जळगाव शहर राजकारण

महासभेत पहिल्यांदाच : जयश्री महाजनांनी केला सुनील महाजनांना विरोध !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज| ७ जुलै २०२३ | जळगाव शहर महानगरपालिकेच्या महासभेत आजवर कधीही न पाहिला मिळालेले चित्र आज पाहिला मिळाला. ते म्हणजे महापौर जयश्री महाजन यांच्या विरोधात विरोधी पक्षनेते सुनील महाजन हे तटस्थ राहिले.

sunil mahajan jayasjtri mahajan

याबाबत अधिक माहिती की, रामानंद पोलीस स्टेशनला गिरणा टाकीजवळ जागा देणे बाबत ठराव महासभेच्या पटलावर आला होता. या ठरावाला सर्वानुमते मंजुरी मिळावी अशी मागणी भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आली होती. जळगाव शहराच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने याला सर्वांनी मान्य करावी असे भारतीय जनता पक्षाचे म्हणणे होते.

---Advertisement---

मात्र शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी अक्षेप घेत ही जागा आज जरी मनपाच्या मालकीची असली तरी देखील संबंधित जागेबाबत कोर्टामध्ये विवाद सुरू आहेत आणि एका व्यक्तीने ही जागा स्वतःची असल्याचा दावा केला आहे याबाबत कोर्ट जो निर्णय देईल त्या निर्णयानंतर पुन्हा महासभेच्या पटलावर हा ठराव आणावा अशी विनंती केली.अखेर यासाठी नगरसेवकांचे मतदान घेण्यात आले.

भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक , शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले . तर ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी याच्या विरोधात मतदान केले. 22- 9 अशा मताधिक्याने हा ठराव पारित करण्यात आला.

मात्र ठरावाच्या अंति , जो निर्णय कोर्ट देईल त्यानुसारच पुढील कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले.जर कोर्टाने ही जागा संबंधित व्यक्तीची आहे असे सांगितले तर हा ठराव रद्द करण्यात यावा अशी भूमिका भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी मांडली आणि याची नोंद त्या ठरावात घेण्यात आली.

मात्र विशेष बाब म्हणजे महापौर जयश्री महाजन यांच्या पत्रावये हा ठराव महासभेच्या पटलावर आला होता. यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्षाची साथ दिली तर ठाकरे गटाची साथ देत त्यांचे पती विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी ठरावामध्ये तटस्थ असल्याची भूमिका घेतली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---