fbpx

महावितरणच्या आडमुठेपणामुळे शेतकरी होरपळले ; उभ्या पिकांचे मोठे नुकसान

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ एप्रिल २०२१ । जामनेर तालुक्यातील भराडी येथील गावानजीक असलेला ट्रान्सफार्म दोन महीन्यापुर्वी जळाला असून अजुनही त्याची दखल न घेतल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. वाढत्या तापमानामुळे केळी सारख्या पिकांना पाण्याची जास्त आवश्यकता असते. परंतु विज उपलब्ध नसल्याने त्यांची पाने करपत आहे. याबाबत विचारणा केली असता. थकीतविजबिलाची कारणे देली जात आहे.  काही शेतकरी विजबिल भरण्यास तयार असुन देखील 80% शेतकऱ्यांची वसुली होईल तेव्हा विजपुरवठा सुक्षळीत केला जाईल असे सांगितले जात आहे.

मार्च-एप्रील पासुन अनेकांच्या विहरींना हौद भरण्या ईतके हि पाणी नसते अशा परीस्थितीत सर्वच शेतकरी विजबिल भरतील असे नाही. मात्र या आडमुठेपणा मुळे बाकीचे शेतकरी होरपळले जात आहे. विजबिल भरण्यास तयार असणाऱ्या शेतकऱ्यांना तरी विज पुरवठा सुरळीत करुन द्यावा हि शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt