जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । मंगरूळ वि.का. सोसायटीच्या १२ जागांसाठी १७ एप्रिल रोजी निवडणूक घेण्यात आली. या चुरशीच्या लढतीत १२ पैकी १२ जागांवर विजय मिळवत मंगरूळ विकासोवर शिवसेनेचा भगवा फडकला. महावितरणने इलेक्ट्रिक व्हेईकलच्या अनुषंगाने पुढाकार घेत राज्यात केलेल्या कामाची नोंद राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. महावितरणला आत्मनिर्भर भारत परिषदेत ‘ट्रान्सपोर्ट अँड मोबिलिटी’ या कॅटेगरीत ‘इलेट्स इनोव्हेशन ॲवार्ड’ प्रदान करण्यात आला. केंद्रीय टेक्सटाईल्स मंत्रालयाचे सचिव यू.पी.सिंग यांच्या हस्ते महावितरणचे संचालक (प्रकल्प) श्री.प्रसाद रेशमे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
ई-वाहनांचा वाढता वापर पाहता महावितरणकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी तसेच नवीन चार्जिंग स्टेशन्सला सुलभ प्रक्रियेद्वारे तत्पर वीजजोडणी देण्यासाठी गती देण्यात आली आहे. त्यासाठी एक खिडकी स्वतंत्र वेब पोर्टल सुरू करण्यात आले आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या नेतृत्वात केलेल्या या सर्व कामाची नोंद घेत हा पुरस्कार महावितरणला देण्यात आला आहे.
राज्य शासनाने ई-वाहन धोरणाद्वारे महावितरणची इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधा पुरविण्यासाठी राज्य नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. ही जबाबदारी स्वीकारून महावितरणकडून पहिल्या टप्प्यात ५० नवीन चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये पुणे-१८, नवी मुंबई- १०, ठाणे- ६, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर व अमरावती येथे प्रत्येकी २ तसेच नागपूर येथील ६ चार्जिंग स्टेशन्सचा समावेश आहे. त्यानुसार महावितरणच्या पहिल्या ईलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन्सचे पुणे येथे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले.
महावितरणने इलेक्ट्रिक वाहन असलेल्या ग्राहकांसाठी ‘पॉवर ॲप’ उपलब्ध करून दिले आहे. या ॲपमध्ये चार्जिंग स्टेशनचे लोकेशन, चार्जिंग चालू बंद करण्याचा पर्याय, चार्जिंग करता आवश्यक चार्जरची उपलब्धता, पेमेंट करता वॉलेट उपलब्ध करून दिले आहे. तसेच ॲपवरून चार्जिंग करता लागणारा वेळ, चार्जिंग करता वापरले जाणारे वीज युनिट व वॉलेटमध्ये उपलब्ध बॅलन्स यांचीही माहिती ग्राहकांना मिळणार आहे.