fbpx

मशिदीच्या जागेबाबत न्यायालयात खटला दाखल केल्यावरुन महिलेसह परिवाराला मारहाण

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ एप्रिल २०२१ । मशिदीच्या जागेबाबत तू न्यायालयात केस का केली, तू ती केस मागे घे अशी धमकी देत फरजानाबी शेख सलीम यांच्या माहेरच्या घरी आरोपींनी अनाधिकृत प्रवेश करत महिलेच्या भावासह घरातील सर्वांना मारहाण केली. ही घटना ३ एप्रिल २०२१ रोजी रात्री ८.१५ च्या सुमारास एरंडोल येथे मशिदअली भागात घडली. या बाबत एरंडोल पो.स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी मध्ये हकीम खान, अब्रार खान, असद खान, अत्ताउला खान, जूबेरखान, शे.सलीम अब्दुल नबी यांचा समावेश आहे.

याप्रकरणी एरंडोल पो.स्टेशनला भाग ५ गु.र.न.५२/२१ भा.द.वी कलम १४३, १४७, ३५४, ३२४, ४५२, ३२३, ४२७, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो. निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, जितेंद्र तायडे, अकील मुजावर, राजेश पाटील हे पूढील तपास करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज