मला गुलाबरावांच्या खोड्या करण्याचा अधिकार – सुष्मा अंधारे


जळगाव लाईव्ह न्यूज । १ नोव्हेंबर २०२२ । पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील मला तीन महिन्यांचे बाळ म्हणत असतील, तर बाळ जसा सर्व खोड्या करतो, त्या करण्याचा मला अधिकार आहे. अशी टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मंत्री गुलाबराव पाटलांवर केली आहे. यामुळे आता जळगाव जिल्ह्यात आलेल्या सुषमा अंधारे या कश्या प्रकारे शिंदे गटाच्या आमदारांवर बरसतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सुषमा अंधारे ह्या तीन महिन्यांचं बाळ असून त्यांनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर कश्या प्रकारची टीका केली होती हे त्यांनी आठवाव असे गुलाबराव पाटील म्हणाले होते.गुलाबराव पाटील चोपडा तालुक्यातील धानोरा येथे १६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यासाठी आले असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली होती. यावर प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी दिलं आहे.

याचबरोबर मी सुप्रीम कोर्टाचा अनादर करणार नाही. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. “सत्य परेशान हो सकता है, पराजीत नहीं” असे म्हणत न्यायालयीन लढाईवर अंधारे यांनी भाष्य केलं.