मनपाने केली तब्बल ‘इतक्या’ कोटींची वसुली

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२३ । महापालिकेच्या घरपट्टी वसुलीच्या अभय शास्ती योजनेंतर्गत आतापर्यंत नऊ कोटी सात लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. या योजनेची २८ फेब्रुवारी ही शेवटची मुदत आहे.

अभय शास्ती योजना सुरू झाल्यापासून फेब्रुवारी महिन्याची आजपर्यंतची एकूण वसुली नऊ कोटी ७ लाख रुपये झाली आहे. गेल्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यातील वसुलीच्या तुलनेत या वर्षी ही वसुली मोठ्या प्रमाणात झाली आहे.

गेल्या वर्षी ही वसुली सव्वा कोटी रुपये होती. महापालिकेच्या अभय शास्ती योजनेचे शेवटचे चार दिवस शिल्लक राहिले असून, नागरिकांच्या सोयीसाठी शनिवारी, रविवारी प्रभाग समिती कार्यालये सुरू राहणार आहेत. थकबाकी न भरणाऱ्यांवर जप्तीची, तसेच नळकनेक्शन कट करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे उपायुक्त गणेश चाटे यांनी सांगितले.