fbpx

भाजपा स्थापना दिनी कार्यकर्त्यांचा सन्मान करुन खासदारांनी केले ऋण व्यक्त

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ एप्रिल २०२१ । एरंडोल येथे खा.उन्मेष पाटील यांनी भाजपा स्थापना दिनानिमित्त एरंडोलचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी,तालुकाध्यक्ष मच्छिंद्र पाटील, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी तसेच तालुक्यातील शहराध्यक्ष यांचा सत्कार करुन त्यांना शाल, श्रीफळ व शिवप्रतीमा भेट दिले. यावेळी खा.पाटील म्हणाले गेल्या ४१ वर्षात पक्ष वाढीसाठी ज्या ज्या लोकांनी ज्ञात व अज्ञात पद्धतीने पक्षाची सेवा केली त्यांच्या प्रती कृतघ्न ता व्यक्त करुन त्यांचा सत्कार करणे हे मझे कर्तव्य मानून त्यांच्या मेहनतीमुळे आज भाजप जगात १ नंबरचा पक्ष ठरला असल्याची भावना व्यक्त केली.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष  नितीन महाजन, डॉ.नरेंद्र पाटील,विक्की पहेलवान,भाजप उद्योग आघाडीचे सचिन विसपुते, भाजप जिल्हा सरचिटणीस सचिन पान पाटील, तालुका सरचिटणीस अमोल जाधव , तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, नगरसेवक नितीन पाटील, भाजपा शहराध्यक्ष निलेश परदेशी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष  प्रशांत महाजन, युवा मोर्चा शहराध्यक्ष आबा चौधरी, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष  कल्पेश पाटील, निखिल सूर्यवंशी, युवा मोर्चा शहर चिटणीस लोकेश महाले,युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष बंटी शेरवानी, पिंटू राजपूत तसेच आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज