बॉक्स ऑफ हेल्प फाउंडेशनच्या वतीने पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिला भगिनींचा सत्कार

जळगाव लाईव्ह न्यूज : ३ एप्रिल २०२३ : बॉक्स ऑफ हेल्प फाउंडेशनच्या वतीने जळगावत पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिला भगिनींचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना फुल आणि साडी देऊन सन्मानित करण्यात आले.

गेल्या महिन्यात म्हणजेच संपूर्ण मार्च महिन्यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. मात्र पेट्रोल पंप काम करणाऱ्या कोणत्याही महिलेचा सत्कार करण्यात आला नव्हता. यामुळे या गोष्टीची नोंद घेत ‘बॉक्स ऑफ हेल्प फाउंडेशन’च्या वतीने महिलांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारासाठी राजश्री शर्मा, सुनिता चौधरी आणि संगीता पाटील यांचे सहकार्य लाभले.