बियाणे, खते आणि किटकनाशकांच्या पुरवठ्याबाबतच्या तक्रारी निपटाऱ्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२१ । कोविड-19 विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने निर्बंध जाहिर केले आहे. त्याअनुषंगाने खरीप हंगाम-2021 मध्ये बियाणे, खते व किटकनाशकांच्या गुणवत्ता व पुरवठ्याबाबत राज्यातील शेतकरी, उत्पादक, वाहतुकदार, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर येणा-या वेगवेगळ्या अडचणींचे निवारणाकरीता कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आयुक्तालय स्तरावर व जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून या कक्षाशी दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संपर्क साधण्यासाठी संपर्काचा भ्रमणध्वणी क्रमांक 8446117500 तसेच कृषि विभागचा टोल फ्री क्रमांक 18002334000 या क्रमांकावर सुद्धा संपर्क करता येईल. सोबतच अडचण किंवा तक्रार [email protected] वर सुद्धा मेलद्वारे पाठविता/नोंदवता येईल.

त्याचबरोबर जळगाव जिल्हास्तरावरही नियंत्रण कक्ष स्थापन करणयात आला असून या नियंत्रण कक्षाचा भ्रमणध्वणी 9307525620 व दुरध्वनी 0257-2239054 या क्रमांकावर संपर्क साधावा. अथवा ईमेल आयडी [email protected] सोबत दिलेले आहेत.

संबंधीतांनी आपल्या जिल्ह्यात येणा-या अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकींगबाबत असलेल्या तक्रारी नोंदवताना आपल्या जिल्ह्याच्या भ्रमणध्वणी, दूरध्वनी व टोल फ्री क्रमांक तसेच ईमेलवर नोंदवाव्यात. तक्रार नोंदविताना शक्यतो आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व अडचणी किंवा तक्रारींचा संक्षिप्त तपशिल द्यावा. किंवा सदरची माहिती को-या कागदावर लिहुन त्याचा फोटो व्हॅटसअप किंवा ईमेलवर पाठविल्यास तक्रारींचे निराकरण करणे सोईस्कर होईल. ज्या शेतक-यांना व्हॅटसअपचा वापर करणे शक्य नसेल त्यांनी दूरध्वनी क्रमांकावर तक्रारी नोंदवाव्यात.

जिल्हास्तरावरील तक्रार नियंत्रण कक्षाकडून तक्रारदाराचे समाधान न झाल्यास आयुक्तालय स्तरावरील नियंत्रण कक्षाकडे नमूद केलेल्या भ्रमणध्वनी, दुरध्वनी व ईमेलवर आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, असे अवाहन दिलीप झेंडे, कृषि संचालक (निवगुनि), कृषि आयुक्तालय, पुणे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज