बिग ब्रेकींग : शरद पवार ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑक्टोबर २०२२ । महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखलकरण्यात आले आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आली आहे. पुढील तीन दिवस ते रुग्णालयात असणार आहेत. ब्रीच कॅंडी रुग्णालय हे मुंबई येथे स्थित आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील तीन दिवस पवार यांना मुंबईतील ब्रीज कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी करू नये, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.

https://twitter.com/NCPspeaks/status/1586982227555983360?s=20&t=FI9bN_hmXXjQdaTGxs-uUw

तीन दिवसांच्या उपचारानंतर दोन नोव्हेंबर रोजी पवार यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्यानंतर तीन नोव्हेंबर रोजी ते शिर्डी येथे येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चार आणि पाच नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शिबिरासाठी शरद पवार हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत, असेही गर्जे यांनी म्हटले आहे.