बस चालक-वाहकाला मारहाण, आरोपीला ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२२ । भुसावळ एस.टी. डेपोचे वाहक दिपक रामकृष्ण बडगुजर, रा. भुसावळ व त्यांच्या सोबतचे एस.टी. चालक अनिल उत्तम पाटील य. एम. आय. डी. सी. जळगाव यांना कर्तव्य बजावत असताना त्यांच्या शासकीय कामात अडबळा करुन त्यांना मारहाण केली व त्याची अडवणूक केली. या कारणावरुन आरोपी नवनाथ आसाराम शिंदे, रा. रामनगर, जळगांव यास आज सोमवारी मे, जिल्हा व सत्र न्यायालय ४. जळगाव यांनी सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा व ५००/- रुपये रक्कम दंड ठोठावला.

भुसावळ एस.टी. डेपोचे वाहक व चालक है दि. २६ एप्रिल २०१८ रोजी त्यांचे ताब्यातील भुसावळ – सुरत ही एस.टी. बस घेवून भुसावळहून निघाले. संध्याकाळी ०० वाजेच्या सुमारास सदर एस.टी. बस खेडी पेट्रोलपंपाजवळ आली असता, आरोपी नवनाथ आसाराम शिंदे याने त्याचे ताब्यातील ज्युपिटर कंपणीची मोटारसायकल क. एमएच १९– सीक्यू ०६९४ ही दुचाकी गाडी सदर एस.टी. बसच्यासमोर आडवी लावली व बस अडवली आणि त्याने बसमध्ये शिरून व वाहकाला मारहाण केली. तसेच वाहकाच्या ताब्यातील टिकीट बुकींगचे पैसे रु. १,०००/- काढून घेतले होते. म्हणून वाहक दिपक बडगुजर यांचे जबाबावरून एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन जळगांव येथे आरोपीविरुद्ध भा.द.वि. कलम ३९४, ३५३, ३४१, ३३२, ५०४ नुसार गुन्हा दाखल झाला होता.

याकामी सरकारपक्षातर्फे सहा. सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी एकूण ०७ साक्षीदार तपासले. त्या साक्षीदारांपैकी सदर वाहक व चालक तसेच पंच साक्षीदार विपुल बडगुजर, वैद्यकीय अधिकारी डॉ. बिराजदार आणि तपास अधिकारी संभाजी त्रंबक पाटील यांचा जबाब महत्वपूर्ण ठरला. संपूर्ण साक्षीपुराव्याअंती अतिरक्ति जिल्हा व सत्र न्यायाधीश – ४, शरद आर. पवार यांनी आरोपी नवनाथ शिंदे यास भा.दं.वि. चे कलम ३५३, ३३२ व ३४१ प्रमाणे दोषी धरुन त्यास सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा व रक्कम रुपये ५००/- मात्र दंड ठोठावला.