fbpx

बंडखोर नगरसेवक – शिवसेनेतील सांकव ‘नितीन लढ्ढा’

mi-advt

 

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२१ । शहर महानगरपालिकेच्या कामकाजात काहीही अडचण आल्यास शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांच्याशी संपर्क साधावा. जर त्यांचाकडूनही ती अडचण सोडवली गेली नाही तर मात्र मला संपर्क करावा असे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी सांगितले.

 

जळगाव शहरातील २७ भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा देत सेनेत प्रवेश केला आहे. बंडखोर नगरसेवकांचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्याशी पटत नसल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होत्या. दरम्यान, रविवारी या सर्व बंडखोर नगरसेवकांची ओळख परिचय करून घेण्यासाठी आणि त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी अजिंठा विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली. यावेळी संजय सावंत यांनी मार्गदर्शन केले.

 

महानगर पालिकेच्या कामकाजात काहीही अडचण आल्यास शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांच्याशी संपर्क साधावा व जर त्यांच्याकडून देखील ती अडचण सोडवली गेली नाही तर मात्र मला संपर्क करावा असे संजय सावंत यांनी सांगितले. संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी नितीन लढ्ढा यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली असून सांकव (नदीवर बांधलेला तात्पुरता पूल) प्रमाणे त्यांना भुमिका बजवावी लागणार आहे. नितीन लढ्ढा हे जेष्ठ आणि अभ्यासू नगरसेवक असल्याने त्यांच्या शब्दाला पक्षात कायम मान आहे. बंडखोर नगरसेवकांच्या अपेक्षा पूर्ण करीत त्यांच्या अडीअडचणी लढ्ढा नक्की सोडवतील असा विश्वास व्यक्त होत आहे.

 

मनपातील या नगरसेवकांचा परिचय संजय सावंतांशी झाला नव्हता. यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महानगरपालिकेतील अडचणींबाबत नगरसेवकांनी संजय सावंत यांच्याशी चर्चा केली अशी प्रतिक्रिया नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना दिली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt